सुरकक्षितता काश्मीरच्या नंदनवनाची………!

0
100
सुरकक्षितता काश्मीरच्या नंदनवनाची
सुरकक्षितता काश्मीरच्या नंदनवनाची

गेल्या काही वर्षात जगाला हादरून सोडणाऱ्या घटनांपैकी एक म्हणजे दहशतवादी संघटनांनी घातलेलं थैमान…..आतापर्यत आपल्या देशाने सगळ्या संकटाना यशस्वीपणे पेललं आहे पण तरीही सुमारे ३ दशकापासून दहशतवाद या समस्येने भारतात एक मोठं आव्हान निर्माण केलं आहे…..

ही समस्या एका राज्यापुरती मर्यादित राहिलेली नाही तर तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण करून सर्व स्तरातील राजकारणालाच अस्थिर करून टाकलं आहे….

विकसित देशांना या दहशतवादाचे जेवढे भय आहे तेवढेच भय विकसनशील देशालाही आहे…..

परदेशातून होणारा आर्थिक व भौतिक पाठिंबा, निरपेक्षपणाची जाणीव ,आत्मत्यागाची तयारी,

अतिरेकी निष्ठा असे काही महत्वाचे घटक आहेत की ज्यावर व्यक्ती निश्चित असे ध्येय गाठण्यासाठी धडपडत असते.

अर्थात त्यांचे हे ध्येय समाजहिताला पोषक नसते किंवा मग त्यातून कोणतीही विधायक बाब अपेक्षित नसते.

काश्मीर मध्ये पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांवर झालेला हा भीषण दहशतवादी हल्ला  त्याचच एक उदाहरण म्हणावं लागेल….

जैशे महंमद या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी उघडपणे स्वीकारली आहे.या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळणे स्वभाविकच आहे.

मुळात दहशतवाद विरोधी लढा हा कोणत्या धर्म किंवा पंथविरुद्ध नाही तर हा मानवी जीवनाचा संहार करणारे गुन्हेगार आणि सुसंस्कृत समाज यांच्यातील लढा आहे.

काश्मीर मध्ये आयसिसचे झेंडे तसेच भारतातून अनेक तरुणांनी आयसिसच्या लढ्यात सामील होण्यासाठी जाणे ही भारताच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.

भारता समोरील खरा धोका हा इस्लामिक स्टेटच्या विचारप्रणालीतून निर्माण होतो त्या विचारप्रणाली मध्ये मने पेटवण्याची जी प्रचंड क्षमता आहे ते भारता सारख्या राष्ट्रला नक्कीच एक आव्हान आहे.

आयसिस ने निर्माण केलेल्या समस्येला लष्करी बळाच्या आधारे सामोरे जाण्याच्या मर्यादा सर्वच राष्ट्र जाणून आहेत…!

आयसिस च्या लढ्याला मुख्यतः बौद्धिक पातळीवर सामोरे जाण्याची गरज आहे.या समस्येवर कोणी एखादी व्यक्ती कोणताही उपाय सुचवून ती सुटणार नाही.मुळात अशी प्रवृत्ती का निर्माण होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न वर्तमानकाळात झाला पाहिजे.

त्याचबरोबर दहशतवादाच्या या वाढत्या बदलांना सामोरे जाताना संकुचित राजकीय मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे.

या दहशतवादाचा  मुकाबला करण्यासाठी हा लढा सातत्याने लढावा लागणार आहे….

दहशतवाद संपवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे.

एकंदर दहशतवाद समस्त मानवजातीचा शत्रू आहे त्यामुळे संभाव्य धोक्याची जाणीव ठेवून प्रतिकारासाठी सज्ज असायला हवं.

देशाचे नागरिक म्हणून आपण आपल्या देशाची राष्ट्रीय अखंडता व एकात्मता जपणे गरजेचे आहे.

 

कारण दहशतवादी हल्ल्यानंतर देखील जातीय सदभाव आणि एकात्मता कायम राखून देशातील लोकच अशा भ्याड हल्याना चोख उत्तर देत आहेत…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here