सावर रे मना……!

0
78
सावर रे मना...…!
सावर रे मना...…!

सावर रे मना……!

hearts

मन कधी वेड…. कधी शहाणं ….
किंवा मग कधीही न सुटणार कोड…..!

आयुष्याचे सारे रंग अंतरंग म्हणजे मन …. किती बर या मनाच्या लीला…..!
हे मन कधी गर्दीत साथ देत…. तर कधी एकांतात…..

कुठलीही गोष्ट मनापासून सुरू होऊन मनापाशीच येऊन थांबते….मग तो आनंद असो वा दुःख असो …..मनाच्या अंतरंगात असलेल्या आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला मनाशी मैत्री ही करावीच लागते…..!
मनात आलेली एखादी गोष्ट ओठांवर आणण्यासाठी
मनानेच green signal द्यायला हवा नाहीतर ती गोष्ट मनातच राहते…..आणि मग उत्तरानाही प्रश्न पडायला सुरुवात होते….!
एखादी गोष्ट मनासारखी झाली की तिथे आनंदाच्या सरी नाचू लागतात…..पण तेच जर एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली की ते चिडत ,रागावत,भांडत,रडत….


कधी सकाळची कोवळी उन्ह मनात उतरतात ….तर कधी हेच मन रात्रीच्या चांदण्यात बुडून जात….
माझ्या मनाचा काही भाग हा सर्वाना दाखवण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करते पण काही भाग मात्र कुणालाही दिसू नये असं कधी कधी वाटत…..

खरंतर आपल्या मनातील आवाज ही एक आकाशवाणीच असते त्यामुळे कधी कधी ह्या मनातील भाव भावनांना,विचाराना वाट मोकळी करून द्यायची गरज असते……!
त्यासाठी प्रत्येकाची पद्धत निराळी…..

काहीजण मनात आलेल्या गोष्टी पटकन सांगून टाकतात…. तर काहीजण एखाद्या सुंदर क्षणाची वाट पाहतात…….
मनातल सांगण्यासाठी समोरची व्यक्ती तितकीच जवळची असायला हवी….. म्हणजे मग खऱ्या अर्थाने मनातल्या हेतूच भावनेत रूपांतर होईल….!

मन गुंतायला आणि तुटायला वेळ लागत नाही….तर वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला….आणि तुटलेल्या मनाला सावरायला…..

या मनाबद्दल व.पु.काळे खूप छान लिहितात ते म्हणतात……

“ज्या मनाला आपण खूप हळवं ….समजत असतो ना ते मुळातच खूप बलदंड…. असत त्याला पर्याय चालत नाही…. त्याला हरवलेली वस्तुच हवी असते आणि दुरावलेली व्यक्ती…….!
गहिवरलेल्या या क्षणात…. या मनालाच वाटत राहत की एक रेशमी स्वप्न नवे उमलावे…..
नकळत कोणीतरी यावे…. आणि मेघ होऊन बरसावे ….. मनात आलेली एक छान सरगम अलगदपणे ओठांवर यावी…..!

मनाचे हे ऋतु असेच चालू असतात अगदी आयुष्याच्या अंतापर्यन्त……!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here