लगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय कहाणी

0
355

लगीर झालं जी मध्ये व्हिलन ची भूमिका करणारे भैयासाहेब म्हणजेच किरण गायकवाड ह्यांना कोण ओळखत नाही अख्खा महाराष्ट्रातील लोकांना भैयासाहेब नचा भूमिकेला पसंद केलं आहे .त्यांचा एक डायलॉग their you are हा खूप फेमस आहे प्रत्येकाचा तोंडात भैयासाहेबांचा हा डायलॉग ऐकायला मिळतो.

लगीर झालं जी चा अगोदर किरण ला कोणीही ओळखत नव्हतं पण त्याचा खास मैत्रणीमुळे म्हणजेच शितली (शिवानी बावकर) हीचामुळे त्याला ही मालिका मिळाली. मालिका मिळाल्यानंतर काही दिवसातच किरण खूप लोकप्रिय झाला.पण ही भूमिका साकारताना त्याला खूप मेहनत घ्यावी लागली आहे.

कारण त्याचा स्वभाव ह्या पात्रापेक्षा खूप विरुद्ध आहे. त्याचा खरा स्वभाव खूप प्रेमळ,साधी राहणीमान असा आहे तर मालिकेलीत भैयासाहेब हा खूप रागीट, मुडी स्वभावाचा ,गावातील मोठा राजकारणी असल्याने त्याचा रुबाब पण तेवढाच मोठा आहे अशा विक्षिप्त स्वरूपाचा भैयासाहेब स्वतः मध्ये उतरवण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली आहे.ह्या मेहनतीच फळ म्हणजे त्याला 2018 चा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला आहे.

किरणला घरातून अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना तो चांगला अभिनय करतो त्याच कारण त्यानं घेतलेली मेहनत आणि त्याने अभिनय क्षेत्रात केलेला संघर्ष .अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर त्याला त्याचा भाषेवर खूप मेहनत घ्यावी लागली . पण आता लगीर झालं जी ह्या मालिकेने त्याचा आयुष्याला वेगळी कलाटणी दिली आहे.

तो एक प्रसिद्ध अभिनेता बनला आहे.लागीर झालं जी ह्या मालिकेसाठी किरणला अगोदर नकार मिळाला होता. भैयासाहेबची भूमिका किरण ला मिळावी म्हूनन त्याचा खास मैत्रिणीने शितलीने (शिवानी बावकर ) खूप प्रयत्न केले होते. शिवानीने किरण चे फोटो तेजपाल ला दाखवले होते.त्यावेळी तेजपाल ने त्याला नकार दिला होता.

शिवानी बरोबरच ह्या मालिकेतील निखिल चव्हाण हा देखील त्याचा खास मित्र आहे किरण निखिल सोबत शूटिंग चा ठिकाणी जात असे.असेच एकदा शूटिंग मध्ये किरण आणि तेजपाल ची भेट झाली .तेजपाल नी किरण ला ओळखले त्याचे फोटो बघितल्याचे सांगितले यावेळी मात्र तेजपालने किरण ला ऑडिशन क्लिप बानऊन पाठवून देण्यासाठी सांगितली.

तेजपाल ने ही क्लिप बघितली आणि त्याला समजले की किरणच भैयासाहेब ह्या भूमिकेसाठी परफेक्ट आहे.तेजपाल ने भैयासाहेबची भूमिका तूच करतोयस हे किरणला सांगितले तेव्हा किरण ला खूप आनंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here