मटण खाताय तर मग सावध व्हा.. मटणातल हाडूक अन्ननलिकेत अडकून एकाचा मृत्यू..

0
255

आपल्या देशातील बहुतेक 75% लोंक मांसाहारी जेवण करतात. मांसाहारी पदार्थातील एक पदार्थ म्हणजे मटण मटण बहुतेक सर्वानाच आवडते. आजकाल पार्टी म्हटले की मटण पार्टी अशी व्याख्याच होऊन बसली आहे. निवडणूक असो, कोणाचा वाढदिवस असो किंवा कोणताही घरातील एखादा छोटासा कार्यक्रम असो पार्टी असतेच आणि मग ही पार्टी साधीसुधी पार्टी नव्हे तर मटणाची पार्टी असते.

पार्टी मग ती घरी असो किंवा हॉटेलमध्ये लोकांना मग ती मटणाचीच पार्टी हवी असते. आणि या मटण खाणाऱ्याचा आब काही वेगळाच असतो. यांना मटण तेही हाडाचेच हवे असते. आजकाल सगळीकडे पाहिले तर व्हेज हॉटेलांपेक्षा नॉनव्हेज हॉटेलमध्ये लोकांची जास्त गर्दी पहायला मिळते.

चला तर मग पाहूयात मटण खाताना अमरावती मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. अमरावती मध्ये मटण खाताना मटणाचे हाडूक अन्ननलिकेत अडकून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या युवकांचे नाव विनोद वाघमारे असे आहे. विनोदच्या घरी मटणाचा बेत केला होता.

तो मटणाचे जेवण जेवत असताना मटणातील जी नळी असते ती चोखून खात असताना अचानक त्याच्या घशात मटणाचे हाड अडकले. आणि विनोदचा शवास कोंडला गेला त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हालविले पण उपचाराआधीच विनोदचा शवास गुदमरून मृत्यू झाला.

डॉक्टरांचे म्हणणे असे आहे की मटणाचे हा विनोदच्या वायुनलिकेत जाऊन अडकले आणि त्यामुळे प्राणवायूचा जो पुरवठा शावासोशावासा मार्गे होतो तो बंद पडला आणि विनोदचा मृत्यू झाला. विनोदच्या बाबतींत घडलेला प्रकार दुर्दैवी असला तरी दुर्मिळच आहे. तेंव्हा सावध हाडाचे मटण खाताना सावधानता बाळगा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here