बघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल ! आणि ईशा बद्दल

0
2591

पुष्पक विमान, सवीता दामोदर पंराजपे,शुभ लग्न सावधान, आणि काशीनाथ घाणेकर असे एकापाठोपाठ एक चित्रपट छोट्या पडद्यावरील ही नमुन्यातील हिंदीतील मालिका आणि सध्या झी मराठीवरील सुरू असलेली तुला पाहते रे ही मालिका खरे तर सगळीकडे तुला पाहतू रे अशी अवस्था प्रेक्षकांची अभिनेता सुबोध भावे च्या बाबतीत झाली आहे. यावर हसतच या टप्प्यावरच्या परिस्थितीत आपण मजा घेत आहोत .असे सुबोध भावे म्हणतो.

दर्जेदार चित्रपट करून मराठी चित्रपटांना त्यांचे गतवैभव मिळवून देण्याचे स्वप्न मनाशी बाळगून असल्याचे तो म्हणतो. लोक खूप सांगतात की सतत प्रेक्षकांसमोर येऊ नकोस निवडक काम कर.पण माझे म्हणजे आहे की अभिनेता म्हणून माझे फार थोडे काम झाले आहे. एक तर मी खूप उशिरा काम करायला सुरुवात केली वयाच्या 25 वर्षानंतर मी अभिनेता म्हणून काम करु लागलो.त्यामुळे माझ्या आयुष्यातील सुरुवातीची 25 वर्षे वाया गेली आहेत. ती भरून काढता येणार नाहीत. अजून किती वर्षे आहेत माहीत नाही त्यामुळे मला इतंक काम करायचं आहे की जेंव्हा मी नसेन तेंव्हा मी केलेल्या कामातून लोकांना पुन्हा पुन्हा आनंद मिळाला पाहिजे.

त्यासाठी थोडथोडकं काम करून समाधान होत नाहीमाझे कसे सुबोध भावे म्हणतो. तुला पाहते रे हि मालिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. याविषयी बोलताना सुबोध म्हणाला मुळात मालिकांमध्ये काम करावं ही माझी इच्छा होती गेल्या ऑक्टोबर मध्ये मी झी मराठीच्या महेश मयेकराशी मी भेटलो तेव्हा चित्रपटांमध्ये काम करण्याचा कंटाळा आला असून तुझ्याकडे एखादा विषय आला तर सांग असे म्हणालो मल मालिकेत काम करायचे आहे सांगितले होते. योगायोगाने या मालिकेची कल्पना त्यांच्या डोक्यात आली त्यामुळे राजू आणि अपर्णा केतकर हे निर्माते मिळाले. आणि तुला पाहते रे ही मालिका प्रेक्षकांसमोर आली. मालिका लोकांना आवडेल असा अंदाज होता पण मालिका पाहून लोक ईतके वेडे होतील याची कल्पना नव्हती कारण काम करताना मी कधीच परिणामांचा विचार करत नाही. मी फक्त काम करतो .या मालिकेचा परिणाम खरोखरच अदभुत आहे.लोक इतक्या प्रेमाने ही मालिका बघतात विचार करतात ,प्रतिक्रिया देतात हे सगळं कमाल आहे. खूप कमी वेळात या मालिकेने घरातील लहाणापासून मोठ्यांपर्यतं सर्वांना बांधून ठेवले आहे. मालिकेचा विषयही लोकांना वेगळा वाटतो आहे. वयाने मोठा असलेला विक्रम आणि त्याच्यापेक्षा निम्या वयाची ईशा याची ही प्रेमकथा लोकांना किती पचेल अशी शंका होती पण सध्या मालिकेला जो प्रतिसाद मिळतोय तो पाहता आपल्या आपल्या समाजातही बदल स्विकारले जात आहेत. काही वर्षांपूर्वी समलैंगिक संबंधाविषयी स्रियांच्या मासिक पाळीविषयी बोलणेही पाप मानलं जायचं आज त्याच विषयांवर पँडमँन सारखा चित्रपट आला आता सर्वोच न्यायालयाचा निर्णय ही आला आहे की समलैंगिक संबंध ठेवायचे की नाही हा तुमचा स्वतंत्र निर्णय आहे. तो कोणत्याही प्रकारे गुन्हा नाही. आजपर्यंत ज्या प्रथा आपल्या समाजात प्रचलित होत्या आता त्या गळून पडल्या आहेत. याचे श्रेय आजच्या नव्या पिढीचे असून ही नवी पिढी अधिक स्वतंत्र आणि नव्या विचारांची आहे. आपल्याला त्याच्याबरोबर पुढे जायचं असेल तर त्याच्याशी आणि त्यांच्या नव्या विचारांशी जुळवून घेतले पाहिजे असे सुबोध भावे ने सांगितले. या पिढीच्या नातेसंबंधाच्या अगदीं व्याखाही बदलल्या आहेत मी जेंव्हा गायत्री आणि त्या वयाच्या मुलांना सांगतो की लग्नाआधी मी आणि माझी पत्नी 10 वर्षे एकमेकांच्या प्रेमात होतो ते ऐकल्यावर आता नाही हे शक्य असा त्यांचा सूर असतो. तुला पहाते रे या मालिकेत सुबोध भावेनी विक्रम सरजांमेच्या भुमिकेसाठी थोडे राखाडी केस ठेवले आहेत या मालिकेतून विक्रम सर म्हणून कसा वाटेल कसा वागेल कसा बोलेल लोकांपुढे कसा येईल डोळ्यांतून कसा व्यक्त होईल या सगळ्याचा विचार करून ही व्यक्तीरेखा साकारायला मजा येत असल्याचे सुबोध भावे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here