पार्टी तो बनती है……..!

0
60
पार्टी तो बनती है........!

कालच valentine day झाला…..आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? तर सांगायचं अस आहे की काहींना हा valentine day  खूप सुंदर गेला असणार…..  म्हणजे एखाद्याने कितीतरी दिवस मनात ठेवलेलं त्याच प्रेम….. Red roses वगैरे देऊन किंवा मग एखाद चॉकलेट देऊन व्यक्त केलं असेल… आणि त्यात जर ते समोरच्या व्यक्तीने accept केलं असेल ……तर दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल……पण  काहींना may be  हा valentine day  तितकासा खास गेला नसणार म्हणजे कस आहे ना प्रेमात पडलेल्या सगळ्याचाच शेवट गोड होतो ……किंवा मग सगळेचजण यात यशस्वी होतात अस नाही ना…….काहीच प्रेम Reject होत तर काहीच direct ब्रेक अप पाशी येऊन थांबत …..पण म्हणून मग त्याच गोष्टीत गुंतून राहण्यापेक्षा move on केलेलं कधीही चांगलं नाही का ? पण हे असं करण नक्कीच सोप्प नसत…..

३ वर्षांपूर्वी आलेल्या ” ए दिल है मुश्किल ” picture मध्ये अनुष्का शर्मा ने तीच ब्रेक अप “मेरे सैया जी से आज मैने ब्रेक अप कर लिया…..”  म्हणत celebrate केलं होतं ……म्हणजे कस आहे ना पहिल्यांदा celebration हे फक्त Happy moments साठीच केलं जायचं……तस पाहिलं तर आम्हा teenagers ला celebration करायला कसलंही  reason लागत नाही पण हल्ली ब्रेक अपच celebration करण्याचा ट्रेड मात्र सगळीकडेच पाहायला मिळत आहे…..

पूर्वी एखाद्याच प्रेम reject झालं की तो त्याच दुःख “दर्द भरे गीत” वगैरे ऐकून त्यावरच समाधान मानायचा….किंवा मग कुटूंबातील सदस्य आणि मित्र मैत्रिणी सोबतचा  सवांद कमी होणे, एकटच राहणे या अशा गोष्टी व्हायच्या……

पण काळ बदलला आणि ब्रेक अप, Rejection यासारख्या  गोष्टिचही celebration व्हायला सुरुवात झाली….

ब्रेक अप झाल्यानंतरही आयुष्य कोणासाठी थांबत नाही हे ही तितकच खर……त्यामुळे ब्रेक अप आणि rejection या दोन्ही गोष्टी स्वीकारणं तितकच  गरजेचं झाल आहे…!

Red colour च्या फुग्यांनी सजवलेला हॉल …..black and white रंगातील कपडे घातलेले friends…….love and friendship songs….. मित्र मैत्रिणी ची मस्ती…….music च्या पावलावर थिरकणारी पावलं……cold drinks ,cake अशी full to fun ब्रेक अप ची पार्टी म्हंटल की दीपिका आणि सैफचा ” love aaj kal ” डोळ्यांसमोर येतो……

सिनेमात असणाऱ्या या गोष्टी आजकाल आपल्या आजूबाजूलाही घडताना दिसत आहेत…..

खर तर ब्रेक अप झाल्यानंतर डिप्रेशन मध्ये जाण यापेक्षा त्या ब्रेक अप मधून उभारी घेत….. ही ब्रेक अप पार्टी केलेली कधीही चांगली…..आणि या सगळ्या प्रवासात आपले जिवाभावाचे friends  असतातच की आपल्या सोबत …..त्यांना औपचारिक निमंत्रण दिल की ते ही या ब्रेक अप पार्टी मध्ये लगेच शामिल होतात….!

ब्रेक अप आणि rejection हे आजकाल खूप समजूतदारपणे स्वीकारलं जात आहे आणि हेच स्वीकारण्यासाठी ही अशी शानदार ब्रेक अप पार्टी दिली जातीये…..

काहीजण तर ब्रेक अप नंतरही त्यांच्यात असलेलं मैत्रीच नात mutual understanding ने जपत आहे….ब्रेक अप झाला तरी त्यांच्यातली मैत्री मात्र संपलेली नाही…..!

पार्टी तो बनती है........!

कारण प्रेमाच्या नात्या बरोबरच मैत्रीची शिदोरीही कायम आपल्या सगळया सोबत नेहमीच असते त्यामुळे ते नात ही जपण तितकंच महत्वाचं ठरत….!

आणि अशा गोष्टीच नक्कीच कौतुक व्हायला हवं…

पण सध्या तरी ब्रेक अप नंतरची ही अनोखी पार्टी …..” पार्टी तो बनती है ” किंवा मग ” अभी तो पार्टी शूरु हुई है…” अस म्हणत celebrate करूया…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here