नीता अंबानी यांनी लग्नासाठी ही अट ठेवली होती. Love Story गरिबीतून श्रीमंतीकडे

0
417
nita ambani

भारतातील सर्वात श्रीमंत असलेल्या नीता अंबानी आपल्या लाईफ स्टाईल बद्दल नेहमीच चर्चेत असतात .आजकाल सोशल मीडियावर तर त्यांच्या साडीपासून ते चहापंर्यत सर्व चर्चा रंगताना आपल्याला पहायला मिळतात. पंरतु आपल्या सर्वांना हे माहीत आहे का आजच्या जमान्यात सर्वात श्रीमंत आणि पॉवर फुल महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीता अंबानी लग्नाअगोदर फक्त 800 रु ची शिक्षिकेची नोकरी करत होत्या. आणि जेंव्हा त्यांचे लग्न मुकेश अंबानी सोबत ठरले तेंव्हा त्यांनी एक अट ठेवली होती.

चला तर मग पाहुया लग्नाआधी नीता अंबानी यांनी कोणती अट ठेवली होती. लग्नाआधी नीता अंबानी या काही कोणी मोठ्या सेलिब्रिटी नव्हत्या. एका शाळेत शिक्षिकेचे काम करत होत्या तेंव्हा त्यांना त्या कामाचे महिना 800 रुपये पगार मिळत असे. जे अंबानी परीवाराच्या दृष्टीने लाखो पटीने कमी होते.

पण म्हणतात ना की ज्यांच्या नशीबात जे असते त्याला ते ते मिळते. असेच काही नीता अंबानी यांच्या आयुष्यात घडले. नीता अंबानी यांना लहान पणापासूनच नृत्याची आवड होती रिलायन्स कंपनीचे मालक धीरुभाई अंबानी यांनी एका संमारंभात नीता अंबानी यांना पंसत केले होते. त्यावेळी नीता अंबानी चे वडील बिटला ग्रुपमध्ये काम करत होते. एकदा बिटल र्वानी परीवारानेएक संमारंभ आयोजित केला होता.

या संमारंभात नीता अंबानी यांनी भरतनाट्यम यावर एक नृत्य सादर केले आणि त्याच्या या नृत्याची सगळ्यानी स्तुती केली होती. या कार्यक्रमात धीरुभाई अंबानी आणि त्यांची पत्नी कोकीला बेन अंबानी हे देखील उपस्थित होते. त्यांनी नीता अंबानी ननृत्य करताना पाहिले आणि ठरविले की मुकेश अंबानी साठी नीता यांना लग्नाची मागणी घालायची.

तेंव्हा धीरुभाई नी कार्यक्रमाच्या आयोजकांकडून नीता यांचा फोन नंबर आणि पत्ता घेतला. आणि एक दिवस धीरुभाई नी नीता यांना फोन केला आणि म्हणाले की मी धीरुभाई अंबानी बोलतोय.तेंव्हा नीता त्यांना म्हणाल्या की मी इलिझाबेथ टेलर बोलतेय असे सांगून त्यांनी फोन कट केला. त्यानंतर धीरुभाई नी पुन्हा एकदा त्यांना फोन केला त्यावेळी नीताच्या वडिलांनी फोन उचलला.

त्यांनी धीरूभाई चा आवाज ओळखला आणि ते त्यांच्याशी बोलू लागले. धीरुभाई चे सर्व बोलणे ऐकल्यानंतर त्यांनी फोन ठेवला आणि ते नीता यांना म्हणाले तु धीरुभाई ना जाऊन भेट त्यावेळी नीतानी त्यांना भेटण्यास नकार दिला. पण त्यावेळी नीता यांच्या वडिलांनी त्यांना समजावले. त्यानंतर नीता धीरुभाई ना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्या. ऑफिसमध्ये धीरुभाई नी त्यांना जेवण बनविणे त्यांच्या आवडी-निवडी व शिक्षण या सर्व गोष्टीबद्द्ल विचारले.

त्यानंतर धीरुभाई नी नीता यांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. व ते त्यांना म्हणाले की मी तुला माझा मुलगा मुकेशच्या पत्नीच्या स्वरूपात पहात आहे. धीरुभाई शी झालेली ही सर्व चर्चा नीतांनी आपल्या वडिलांना सांगितली. त्यानंतर त्या जेंव्हा अंबानी यांच्या घरी पोहचल्या तेंव्हा मुकेश यानीच दरवाजा उघडला.

मुकेश यांनी नीताला पाहता क्षणीच ओळखले. कारण धीरुभाई इतके दिवस त्यांच्या बद्दलच सांगत होते. नंतर त्या दोघांचे एकमेकां सोबत बोलणे झाले आणि पुढे कधी भेटायचे हेही ठरले. काही दिवसात दोघे एकमेकांना डेट करु लागले. पण जेंव्हा मुकेश अंबानी यांनी नीता यांना लग्नासाठी विचारले तेंव्हा त्यांनी त्यांच्या समोर एक अट ठेवली.

अट अशी होती की लग्नानंतर सर्वात श्रीमंत कुंटुबाची सुन बनल्या नंतर सुद्धा त्यांना एक सामान्य जीवन जगायचे होते. आणि त्यांना त्यांची शिक्षिकेची नोकरी पण करायची होती. मुकेश अंबानी यांना नीता खूपच पंसत असल्यामुळें त्यांनी त्यांच्या सर्व अटी मान्य केल्या. आणि त्यांना शिकवण्याचीही परमिशन दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here