ती’ चा हक्क…..! आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे .

0
106

ती’ चा हक्क…..! आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे . हे एक अस व्यक्तिमत्व आहे की जिला जर कल्पवृक्षाची उपमा दिली तर नक्कीच अतिशयोक्ती होणार नाही.अस म्हणतात की कल्पवृक्षाकडे काहीही मागा तो तुमची इच्छा लगेच पूर्ण करतो आणि त्या बदल्यात तो तुमच्याकडे काहीही मागत नाही.असच काहीस आईचही असत….!

पण आईच्या याच सगळ्या गोष्टीला आपण आतापर्यंत गृहीत धरत आलोय.तिने केलेल्या कामचा काही मोबदला ही असू शकतो अस आपल्याला स्वप्नात देखील वाटत नाही……! गृहिणीला घरात राहून असंख्य गोष्टी पार पाडाव्या लागतात.त्याच मोल होणं अशक्यच त्यात तिच्यात असणाऱ्या गुणवत्ताही काळानुसार दुय्यम ठरत गेल्या.गेल्या काही वर्षांमध्ये गृहिनीकडे किंवा मग घरकामाकडॆ लोक सन्मानाने बघत आहेत.’House wife’ ऐवजी ‘Queen of the house’ असही म्हंटल जात पण तिला मिळणारी वागणूक मात्र अजूनही तशीच आहे…..!

५ वर्षांपूर्वी केंद्रीय बाल व महिला खात्याच्या मंत्री कृष्णा तीरथ यांनी गृहिणींना मानधन देण्याची संकल्पना मांडली होती.आणि या गोष्टीकडे लक्ष वेधण्याचा एका संपादकाने प्रामाणिक प्रयत्नही केला होता.पण तरीही परिस्थिती जशी आहे तशीच राहिलीे. स्त्रियांचं देशाच्या जडणघडणीतल अप्रत्यक्ष योगदान अतुलनीय आहे.मग त्याला अर्थव्यवस्थेतही स्थान आणि सन्मान हे दोन्ही मिळायला हवे.या अशा विचारांचं तर नक्कीच स्वागत व्हायला हवं पण पुढे या बद्दल काहीच झाल नाही…..! मुळात आईला पगार देने हीच concept खूप जणांना सहन न होणारी आहे.पण ‘ती’ ला व्यावहारिक प्रतिष्ठा नक्कीच मिळायला हवी….!

630-07071141
© Masterfile Royalty-Free
Model Release: Yes
Property Release: No
Woman standing with her schoolgirl in the field, Sohna, Haryana, India

गेल्याच वर्षी चीन मध्ये झालेेल्या miss world स्पर्धेत विजयी झालेल्या मानुषी छिल्लार हिने तिला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ….आईच्या कष्टाचे मोल होऊ कधीच होऊ शकत नाही पण तरीही सगळ्यात जास्त पगार हा आईचा असायला हवा असे सांगितले…..! तस पाहिलं तर आईला आपण कथा ,कादंबऱ्या ,कविता ,चित्रपट,नाटक या सगळ्या मधून रोजच भेटत असतो.पण ही फक्त सुभाषिते …! आईच्या कामाला ना तासाची मर्यादा…. ना निवृत्तीचे वय….आणि ना पगाराची अट…. पण मुळात बदल हा आपल्या दृष्टीकोनात व्हायला हवा …..त्यासाठी कोर्टात जायची गरज नक्कीच पडणार नाही आणि चांगल्या गोष्टीच्या सुरुवातीसाठी आपल्या घरासारखं दुसर ठिकाण कुठलच नाही…..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here