ऑनलाईन बिनलाईन…….

0
52

आजकालची तरुण पिढी वाचत नाही असा सूर सगळीकडेच ऐकायला मिळतो …..पण मला वाटत ते तितकस खर नाहीये …….!

चला मान्य केलं की आजकाल पुस्तकाची जागा ही cinema, webseries ,social media यांनी घेतली असेलही….. पण तरी आजकालची पिढी वाचत नाही किंवा मग वाचनसंस्कृतीच लोप पावत चालली आहे …..हे काही मला मान्य नाही…..!

आणि त्यातल्या त्यात वाचन हे साचेबद्ध किंवा मग knowledge oriented च असायला हवं असा आग्रह मोठ्याप्रमाणात केला जातो…..

म्हणजे काय वाचता असा समोरच्याने प्रश्न केला की छावा,ययाती,स्वामी ही पुस्तक वाचतो…. हे त्या समोरच्या माणसालाच expected असत ….आणि जर आम्ही chetan bhagat यांचे पुस्तक वाचतो अस उत्तर दिल तर समोरच्याचा चेहऱ्यावर आश्चर्य नक्कीच पाहायला मिळत…….!

आणि त्यातच पुढचा प्रश्नही लगेच तयार असतो की काय भेटत ही असली पुस्तक वाचून?

या त्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांना एवढच सांगावस वाटत love, Friendship, Relationship अशा कितीतरी आम्हाला जवळ वाटणाऱ्या मुद्यांना त्यांनी आपल्या लिखाणातून व्यक्त केलं आहे……!

त्याची Half girlfriend मधली रिया-माधवची lovestory असो ….. 2 states मधला दोन cultures चा गोंधळ असो ….. किंवा मग Five point someone  मधली 3 मित्राची आणि त्याच्या मैत्रीची गोष्ट असो ……ती मनाला भिडते त्यातली सगळी पात्र कुठेना कुठेतरी आपल्याला भेटली आहेत

याचा आनंद होतो……!

त्याच्या पुस्तकातून भले मग काही knowleged न मिळो पण जगण्याची एक नवी ऊर्जा मिळते…..!

सजग आणि समर्थ समाज घडवायचा असेल तर वाचन संस्कृती रुजावी  लागते आणि ती चांगल्या पद्धतीने रुजावी  यासाठी तस वातावरणही निर्माण करावं लागतं …….त्यासाठी अर्थातच वाचक हा केंद्र बिंदू असायला हवा……!

दुकानात जाऊन पुस्तक विकत घेण्यापेक्षा ई -बुकवर वर पुस्तक वाचण्याला आजकाल जास्त प्राधान्य दिल जात…..त्याच बरोबर ऑडिओ बुक्सला ही मोठ्याप्रमाणात response मिळत आहे…..!

ebooks

म्हणजे वाचणारा वर्ग आजही मोठ्या प्रमाणावर आहे फक्त त्याची वाचनाची साधन आणि पध्दत मात्र बदलली आहेत……!

आम्हाला ही पु.ल च ‘बटाट्याची चाळ’, मिलिंद बोकीलांची  ‘शाळा’,  वि.वा. शिरवाडकराची ‘दुनियादारी’ या सगळ्या पुस्तकात रमायला नक्कीच आवडत ……पण वाचण्याला कुठल्याही प्रकारचा बंधन नसावं एवढंच आमचं म्हणणं आहे …..!

आमच्या songs च्या list मध्ये सगळेजण असतात अगदी लता मंगेशकर ,किशोर कुमार ,मोहमद रफी,आशा भोसले पासून ते सोनू निगम,श्रेया घोषाल, अरमान मलिक,गुरू रंधावा,अरजित सिंग पर्यन्त …..

म्हणजे जून नवं अस एकत्र नांदत इथे तसच वाचनाच्या बाबतीतही व्हायला हवं……!

तस पाहिलं तर लेखनाचा प्रवासही वाचनातूनच सुरू होतो……वाचलेलं आपण रोजच्या आयुष्याशी Relate

केलं की मग लिहियाला अजूनच मजा येते……!

मनात जे काही साचल जात त्याला शब्दरूप देण्याने आपण स्वतःलाच नव्याने भेटत असतो…….!

काहीजण तळमळीने व्यक्त होण्याचं साधन म्हणून facebook, whatsapp कडे बघतात……आणि या माध्यमाचा उपयोग करून कितीतरी जण सामान्य माणसाचे प्रश्न लोकांसमोर मांडायचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहे ….…..!

कल्पनाविश्वात रमण्यापेक्षा वास्तव गोष्टीचा अनुभव घेऊन लिहणाऱ्यांचं प्रमाण आज मोठ्याप्रमाणात आहे…..आणि ही नक्कीच एक कौतुकाची गोष्ट आहे….आणि हे पुढेही असच चालू रहायला हवं हीच  किमान अपेक्षा….!

वाचाल तर वाचाल हे अगदी खरं आहे पण वाचनाला कुठलेही बंधन नको किंवा मर्यादाही नको …कारण  या सगळ्यात वाचनसंस्कृतीच टिकून राहणं जास्त महत्वाचं आहे …..हो की नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here