आयुष्याच्या वळणावरती…….!

0
76
आयुष्याच्या वळणावरती.......!
आयुष्याच्या वळणावरती.......!

आयुष्य हे कितीतरी वेगवेगळ्या रंगानी भरलेलं आहे…. हे रंग घेऊनच  तर ते सजवायच असत….!

मंगेश पाडगावकरानी म्हटल्या प्रमाणे या जगण्यावर प्रत्येकाला प्रेम करण शक्य आहे…..

पण तरीही तशी ती कसरतच आहे म्हणा …कारण आपल्या आनंदाला मर्यादा नाहीत….पावसाचा गारवा,गुलाबी थंडी, पक्ष्याचे गाणे ,लहान मुलांमधील निरागसपणा, मातीचा  सुगंध,या सगळ्या गोष्टी मुळे तर आपलं आयुष्य सुखकर बनत असत……आणि मग या जगण्यावर शतदा प्रेम करायला तितकंसं अवघड जाणार नाही  त्याउलट जगण्याचा आनंद शतगुणीत होईल….!

आयुष्य हे कस जगावं या बाबतीतच्या प्रत्येकाच्या कल्पना या वेगवेगळ्या असतात …..

कुणी आयुष्याला मॅरेथॉन म्हणत …..तर कुणी याच आयुष्याला एका शांत समुद्राची उपमा देत….

प्रत्येकाने खूप छान जगावं आणि जगता जगताच स्वतःच्या अंतरंगातही पाहावं आणि त्यासोबतच इतरांच्या आनंदी जीवनाच आपणही साधन व्हाव….!

आपल्याला हे आयुष्य जगताना नक्की काय हवं आहे हे आधी ठरवणं गरजेचं असत…..

आयुष्य हे कधीही कॅलेंडरच्या पानात किंवा मग दिवसाच्या या 24 तासाच्या मध्ये कधीच अडकून राहत नाही….आणि नाही ते कुठल्या ऋतू मध्ये अडकत.

आपल्या गतीनं ते चालत असत ,धावत असत ..

पण आयुष्याच हे जीवनगाण म्हणजे नक्की काय ?

आयुष्य म्हणजे चढ उतार….. आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा मेळ…..आयुष्य म्हणजे यश अपयशाचा खेळ…..!

या आयुष्यामध्ये कुणाला चांदण्याची सोबत हवी असते……. तर कुणाला सोबतीच चांदण……!

आयुष्य एकच असत पण या एका आयुष्यातच आपण किती वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो ना……

कधी एक लहान मूल म्हणून ….कधी एक रुबाबदार तरुण किंवा तरुणी म्हणून…. तर  कधी एक वृद्ध म्हणून …..!

पण खरंच एवढंच आहे का हे आयुष्य का या पेक्षा ही काही जास्त आहे …….

खरतर आयुष्याचा आशय आयुष्य जगण्यात च आहे……!

सुख, दुःख ,अनुभव, या सगळ्यांसोबत चालत राहणं त्याचा एक घटक बनण…. किंवा मग या सगळ्यांनी आपल्याला स्वतःचा एक घटक बनवणं …..हे खूप आनंददायी असत….

आयुष्य किती वळण घेत चालत असत …..आयुष्याच्या या प्रत्येक वळणावरती मी नव्याने स्वतःला शोधत असते….. गगनभरारी घेणारा पक्षी ….मनमुरादपणे वाहणारा झरा…. बेधुंद होऊन जगणारी फुलपाखरे…..हे सगळे जण मिळालेल्या क्षणाच सोन करतात मग आपण स्वतःच चांदण्यांनी भरलेलं आभाळ रिकामं का मानावं?

मोजून तोलून नात्याचा हिशेब ठेवण्यापेक्षा नवीन निरागस अशी नाती निर्माण करावी ….जपावी….आणि ती टिकवण्यासाठी प्रयत्न ही करावेत…..!

मग ते नात फुलांशी, झाडांशी, प्राण्यांशी, पक्ष्यांशी, अगदी मग ते कोवळ्या मुलाशी असलं तरी चालेल…

हे आयुष्य खूप सुंदर आहे …..आकाशाची नितळ निळाई,वसुंधरेची हिरवाई …..आणि त्यात क्षितिजाची थोडीशी लाली मिसळली तर मिळालेलं छोटस आयुष्य ही नक्कीच गोड होईल……हे आयुष्य किती जगायचं हे जरी आपल्या हातात नसल तरी ते कसं जगायचं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे……!

आयुष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here