‘आनंदीबाईंचे’ जीवनगाणे……..!

0
93
डॉ. आनंदीबाई जोशी
डॉ. आनंदीबाई जोशी

प्राचीन काळापासून आजपर्यंत जगभरात अनेक कर्तबगार महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अंध:कारात असणाऱ्या अनेक महिलांच्या जीवनात प्रगतीचा दिपस्तंभ निर्माण केला आहे.

स्त्री जन्म म्हणजे समाजाने लादलेल कमकुवत शक्तीच एक खूप मोठं ओझ असच काहीस त्याकाळी मानलं जायचं पण अशा या ओझा खाली न झुकता एखादी स्वाभिमानी स्त्री एक महान पद मिळवते यापैकीच एक म्हणजे डॉ. आनंदीबाई जोशी.

डॉ. आनंदीबाई
डॉ. आनंदीबाई

एकीकडे स्त्रियांना अजूनही अनेक क्षेत्रात डावलल जात असताना १९ व्या शतकात अमेरिकेत जाऊन वैद्यकिय शिक्षण घेऊन भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान आनंदीबाईना मिळाला.

या काळात स्त्रियांना वेदाअध्यनापासून ,ज्ञानापासून वंचित ठेवले होते.स्त्री म्हणजे गुलामचं आहे असं त्याकाळी मानलं जायच.यावेळी स्त्रियाना घराबाहेर पडण्याची ही मनाई होती.स्त्रीयांना यावेळी कसलाच अधिकार नव्हता.

समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी स्त्री ही शारीरिक दृष्ट्या दुबळी आहे असं सांगताना रणांगणावरच्या पुरुषाच्या पराक्रमाचे दाखले दिले जातात पण याला छेद देणारी अनेक उदाहरणे आहेत त्यापैकीच एक म्हणजे आनंदीबाई जोशीची जीवनकहानी.

आनंदीबाईचे पूर्वीचे नाव यमुना. त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात झाला.गणपतराव जोशी यांच्या या जेष्ठ कन्या.वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्याचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला.गोपाळरावानी त्याच यमुना हे नाव बदलून आनंदीबाई अस ठेवलं.

त्यानंतर वयाच्या अवघ्या १४व्या वर्षीच त्यानी एका मुलाला जन्म दिला पण त्याकाळी वैद्यकीय सेवा न मिळाल्याने तो १० च दिवस जगू शकला.

आणि हीच गोष्ट आनंदीबाईना डॉक्टर आनंदीबाई जोशी होण्यास कारणीभूत ठरली.

गोपाळराव हे पोस्ट ऑफिसात असल्याने त्यांची नोकरी ही बदलीची असे.ते स्वतः लोकहीतवादीची शतपत्रे वाचत.आनंदीबाईना शिक्षणात रस आहे हे त्यांनी जाणले होते आणि त्यामुळे त्यांनी आनंदीबाईना इंग्रजी शिकवण्याचा निश्चय केला.

कोल्हापुरात असताना मिशनऱ्यांशी ओळख वाढल्यावर गोपाळरावांना वाटले की आनंदीबाई नी  अमेरिकेला जाऊन  वैद्यकिय शिक्षण घ्यावं.पण हे इतक्या सहजासहजी होणार नाही हे त्यांना माहीत होतं.

डॉ. आनंदीबाई जोशी.

स्त्री म्हणजे गुलाम हे असं समीकरण त्या काळात रूढ असताना एका स्त्री ने परदेशात जाऊन शिक्षण घेण हे त्याकाळच्या समाजाच्या पचनी न पडणार होत आणि याचे कितीतरी दुष्परिणाम आनंदीबाईना भोगावे लागले.पण त्यांची शिकण्याची जिद्द या सगळ्या गोष्टींना पार करून गेली.

अमेरिकेला जाण्यापूर्वी श्रीरामपूर (बंगाल) येथे आनंदीबाईनी मी अमेरिकेस का जाते ? यावर बॅटिस्ट  कॉलेजमध्ये व्याख्यान दिल यात त्या म्हणाल्या पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्थान इतका रानटी देश दुसरा कुठला नाही.सभ्य स्त्रिया पुरुष वैद्याकडून तपासून घेण्यास नकार देतात त्यामुळे इथे स्त्री डॉक्टरांची गरज आहे.

न्यूजर्सी मधल्या रोशेल गावातील श्रीमती कार्पेटर यांच्या मदतीने आनंदीबाईनी  वयाच्या १८ व्या वर्षी अमेरिकेच्या ‘विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिलव्हानिया ‘ यात प्रवेश घेतला.पण इथेही त्यांना खूप खडतर गोष्टींना सामोरे जावे लागले .

भारतीय पद्धतीचे अन्न न मिळाल्याने झालेली उपासमार, परदेशी कपडे घालायचे नाही म्हणून साडी घालणे व त्यामुळे तेथील थंडीचा त्यांच्या शरीरावर खूप परिणाम झाला.

पण या सगळ्या परिस्थिती ला धीराने सामोरे जाऊन १६ नोव्हेंबर १८८६ ला त्या एम. डी. ची पदवी घेऊन भारतात परतल्या.तेव्हा मुंबई बंदरावर त्यांचं खूप मोठ स्वागत झालं.पण तोपर्यन्त त्याना क्षयाची बाधा झाली होती.समुद्रपार गमन करून आल्याने त्यांना सगळ्याच डॉक्टरांनी तपासायला नकार दिला आणि यातच २६ फेब्रुवारी १८८७ ला त्यांचं निधन झालं.

पण या सगळ्यात आनंदीबाईच्या ज्ञानाचा उपयोग मात्र जनतेला होऊ शकला नाही ही एक फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.

अवघ २० वर्ष आयुष्य मिळालेल्या आनंदीबाईच १५० वर्षाहूनही अधिक वर्ष झालं तरी भारतीयांच्या मनातल स्थान मात्र अढळ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here