आठवणींचा खेळ सारा……….!

0
74

थंडीचे दिवस असल्यामुळे चहूकडे असलेल उबदारस ऊन हवहवस वाटत ….या थंडीत संध्याकाळ लवकर दाटून येते .……आणि आजूबाजूने अंधाराचे पडदे ओढले जात असल्याची जाणीवही होते…..!

पण याच अंधारात काही क्षण असे असतात की जे मनाच्या अंतरंगात…… खूप खोलवर रुतून बसतात आणि मग अचानक एखाद्या क्षणी एकदम वर येतात…..!

मग तो शाळेचा किंवा कॉलेजचा पहिला दिवस असो,पहिल्यादा अनुभवलेला पाऊस असो ,पहिलं प्रेम असो,सूर्यास्ताचा सुंदर देखावा असो ,लेक्चर्सला न बसता कॅफे मध्ये जाऊन पिलेली कॉफी असो,किंवा मग कॉलेजला दांडी मारून मित्र मैत्रिणी सोबत पाहिलेला पहिला सिनेमा असो …..!

आठवणींचे हे सारे कप्पे मी अगदी सवडीने उघडून बघते…..आणि मग माझ्या समाधानाच्या पूर्ण रूपाच दर्शन इथेच तर घडत……!

आठवणींचा हा अल्बम माझ्या आयुष्याचा एक अनोखा ठेवा आहे…..Camera किंवा Mobile मध्ये click  केलेला एखादा फोटो नाही आवडला तर लगेच Delete ही करता येतो…. पण या आठवणींचं मात्र अस होत नाही…. हो पण त्या पुन्हा Rewind मात्र करता येतात आणि मग हे आपले हक्काचे क्षण आपल्याला नव्याने समजतात … पुन्हा एकदा नव्याने अनुभवता येतात……!

या आठवणीचंही काहीस आपण जपून ठेवलेल्या वस्तू सारखच असत…. म्हणजे कस आहे ना या वस्तूना खूप दिवस बघितलच नाही की त्यावर धूळ चढते आठवणीचही अगदी तसच आहे….!

आपली सावली जशी आपल्याबरोबर नेहमी असते ना तसच या आठवणी ही नेहमी आपल्या सोबतच असतात……

काही आठवणी या लख्खपणे आठवतात ….तर काही आठवणी या पुसटश्या आठवत असतात…. पण म्हणून मग त्याच महत्त्व नक्कीच कमी होत नाही…..!

उलट आठवणींचा हा गुंता सोडवायला एक वेगळीच मजा येते….खरतर मनातल्या आठवणीचा हा उजाळा खूप मौल्यवान असतो….!

याच आठवणी कधी हसवतात…..तर कधी रडवतात…किंवा मग एकटेपणात याच आठवणी आपल्याशी हितगुज करतात……!

आठवणीत रमण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नसते ….कारण त्या फक्त आणि फक्त आपल्या असतात…..त्याच्यावर असणारा हक्क ही फक्त आपलाच असतो…….!

अश्याच एका अनोळखी व्यक्तीच्या आठवणीत रमताना

आपोआपच काही ओळी ओठांवर येतात ……

“तू असताना तुझ्याभोवती मन वेडे भिरभिरते…

तू नसताना तू नसण्याचे निमित्त शोधत फिरते

आठवणींच्या या गुंत्यात खोलखोल गुरफटते….

तू नसताना तू नसण्याचे निमित्त शोधत फिरते .”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here